पनवेल (संजय कदम) : तळोजा आद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या विस्टा प्रेसिडेड फूड्स प्राव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने सी एस आर फंड योजने अंतर्गत गाडगीळ गुरूजी सामाजिक व शैक्षणिक या संस्थेला कायदे सल्लागार चंद्रशेखर सोमण यांच्या प्रयत्नाने भरीव अशी मदत करण्यात आली आहे.
विस्टा प्रेसिडेड फूड्स प्राव्हेट लिमिटेड ( अन ओ एस आय ग्रुप कंपनी ) तळोजा. यांच्या कडून आज कंपनीने त्यांच्या सी एस आर फंड योजने अंतर्गत गाडगीळ गुरूजी सामाजिक व शैक्षणिक संस्थेला त्यांच्या विविध सामाजिक व शैक्षणिक कामांसाठी भरीव अशी एक लाख रूपयांची मदत केली गेली आहे.
ही संस्था आदिवासी लोकांना आरोग्य विषयक वेगवेगळे उपक्रम व आरोग्य सेवा या निधीतून उपलब्ध करणार आहे कंपनीच्या वतीने सी ई ओ भुपिंदरसिंग, कायदे सल्लागार चंद्रशेखर सोमण, अकाउंट्स सुब्रमण्यम राव व . एच . आर च्या इंद्रायणी, प्लांट हेड प्रविण ठाकूर यांनी महत्त्व पुर्ण सहकार्य केले. त्यामुळेच आज सदर धनादेश संस्थेच्या वतीने महेश गाडगीळ यांनी स्विकारला.
यावेळी बोलताना कायदे सल्लागार चंद्रशेखर सोमण यांनी सांगितले की, कंपनीच्या सी एस आर फंड योजने अंतर्गत वेळोवेळी समाजासाठी प्रामाणिक पणे काम करणाऱ्या संस्थांना मदत केली जाते. अश्याच प्रकारे आज गाडगीळ गुरूजी सामाजिक व शैक्षणिक संस्थेला त्यांच्या विविध सामाजिक व शैक्षणिक कामांसाठी मदत केली जात आहे व यापुढे सुद्धा अश्या प्रकारे मदत करू असे आश्वासन त्यानी दिले .