विस्टा प्रोसेस फुड कंपनीचा स्तुत्य उपक्रम ! बारा शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

vista
पनवेल (संजय कदम) : तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या विस्टा प्रोसेस फुडच्या सिएसआर फंडातून सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपत परिसरातील १२ जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी प्रामुख्याने कंपनीचे डायरेक्टर भुपिंदरसिंग व कायदेशीर सल्लागार चंद्रशेखर सोमण यांनी विशेष करून पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना लाभ मिळवून दिला.
तालुक्यातील शिरवली, कुत्तरपाडा, मोहदर, चिंचवळी, पालेखुर्द, चिंध्रण, ढोंगऱ्याचा पाडा, खैरणे, वावंजे, नितलस, कोंडप, करंबेळी, महाळुंगी, आंबे, चिंध्रण जिल्हा परीषद शाळांना बेंच, कपाटे, खुर्ची, संगणक आदी वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम कुत्तरपाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला सिएफओ सुब्रमण्यम राव, प्लांट हेड प्रविण ठाकूर, एचआरचे प्रथमेश पाटील, या कार्यक्रमाचे समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते विश्वास पेटकर, विलास पाटील, पंचायत समितीचे समन्यवक समितीचे प्रमुख श्री मेटकर, जिल्हा मुख्यध्यापक संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री भोपी यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कमिटी प्रमुख, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना कायदेशीर सल्लागार चंद्रशेखर सोमण यांनी सांगितले कि, गेल्या अनेक वर्षांपासून विस्टा प्रोसेस फूड कंपनीने आपल्या सिएसआर फंडाच्या माध्यमातून अनेक सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविले आहेत. तळोजा परिसरातील अनेक शाळेमधील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची हौस व इच्छा आहे. परंतु अनेकवेळा नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेणे परवडत नाही. हि खंत सामाजिक कार्यकर्ते विश्वास पेटकर यांनी बोलून दाखवली व त्यादृष्टीने कंपनीमार्फत मदत व्हावी अशी आशा व्यक्त केली होती. खरोखरच आज अश्या विद्यार्थ्यांना विविध शालोपयोगी वस्तूंचे वाटप करताना आनंद होत आहे.
आगामी काळात लवकरच परिसरातील आणखी १२ शाळांना वस्तूंचे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळेला उपस्थित मुख्यध्यापक व इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विस्टा फूडच्या या उपक्रमाचे कौतुक करून अश्याच प्रकारची मदत त्यांनी वेळोवेळी करावी अशी आशा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *