वीर वाजेकर पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन

vaaje

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुका जडण घडणी मध्ये सिंहाचा वाटा असलेले , उरणच्या इतिहासातील एक महत्वाचे कामगार नेते, समाजसेवी व्यक्तिमत्व, मिठागर कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते स्वर्गीय वीर वाजेकर यांच्या 40 व्या पुण्यतिथीचे आयोजन मिठागर कामगार संघ कार्यालय कोटनाका उरण शहर येथे सोमवार दि 15/2/2021 रोजी सकाळी ठिक 10 वाजता उरण पेठा मिठागर कामगार संघ, उरण पेठा मीठ उत्पादक सहकारी संस्था, उरण महल सहकारी मजदूर संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

जेष्ठ मान्यवर, चेअरमन, संचालक, सभासद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त कामगारांनी, सभासदांनी, नागरिकांनी या कार्यक्रमास हजर राहावे असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.