वॉशिंग्टन : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसच्या बाहेर एका व्यक्तीला गोळ्या घालण्यात आल्या, ज्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकार परिषदेतून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. पत्रकार परिषदेत स्वत: अध्यक्ष ट्रम्प यांनी या घटनेला दुजोरा दिला.
ट्रम्प म्हणाले, ‘व्हाईट हाऊसच्या बाहेर गोळीबार सुरू होता आणि वाटते की, तेथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सेक्रेट सर्व्हिसचे आभार मानतो त्यांनी तात्काळ कारवाई केली. एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिक्रेट सर्व्हिसने त्याला गोळ्या घातल्यासारखे वाटते.’
गोळीबारानंतर घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आली तेव्हा डोनाल्ड ट्रम्प पुन्हा पत्रकार परिषदेत आले आणि त्यांनी माहिती दिली. फॉक्स न्यूजनुसार, दोन आवाज ऐकू आले. त्यानंतर, सिक्रेट सर्व्हिसचे एजंट झाडांच्या मागे दिसले.
ट्रम्प म्हणाले, गोळीबार प्रकरणातील तरुणांची ओळख किंवा हेतू माहित नाही. ट्रम्प यांना जेव्हा या युवकाकडे शस्त्रे आहेत का असे विचारले असता त्याने हो म्हटले. ही घटना व्हाईट हाऊस बाहेर घडली जिथे आता मोठ्या संख्येने सैन्य उपस्थित आहे.