पनवेल (संजय कदम) : शाळेत जाताना चौदा वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर मुलगी वावंजे येथील शाळेत जाते वेळी तिला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले. तिचा रंग सावळा, अंगाने मध्यम, उंची पाच फूट आहे. तिने अंगात लाल रंगाचा फुल पंजाबी ड्रेस घातला असून सोबत मोबाइल आहे. तिचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.