मुंबई (शांताराम गुडेकर) : दापोली तालुक्यातील जि.प. शिरसोली शाळेची सामान्य कुटुंबातील विद्यार्थीनी कु.धनश्री संजय जाधव ही ठरली गगन भरारीसाठी भाग्यवंत.तालुक्यातून शिगेला लागलेली उत्सुकता अखेर धनश्री संजय जाधव हिने नासासाठी तर जालगावची तनिष्का जयंत बोधगावकर आणि मळे शाळेतील सुयश सुनील गोसावी यांनी इस्त्रो भरारीसाठी चार चाळणी चाचणी मधून अंतिम विजेते पद पटकावले.
जि.प.शाळेत शिकणारी ही मुले कुशाग्र बुद्धिची असल्याचे त्यांनी सिध्द केले आहे. याबद्दल शिरसोली येथे गट शिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव,जाणू विज्ञान अनुभवो विज्ञान या उपक्रमाचे दापोलीचे प्रमूख उत्तम राठोड,पालगड शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल सावंत तसेच पद्मन लहांगे यांनी शिरसोली शाळेत जाऊन मार्गदर्शक शिक्षक व धनश्री यांचा सत्कार करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.जिथे कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नाही अशा शिरसोली गावच्या मराठी शाळेतील विद्यार्थीनीला अमेरिका नासाला जाण्याची संधी मिळाली तालुक्याची गुणवत्ता कायम ठेवत अगदी केंद्रापासून जिल्ह्यापर्यंत झालेल्या वस्तुनिष्ठ चाळणी परीक्षेत शिरसोली शाळेचे यश हे भुषणावह असल्याचे उत्तम उदाहरण आहे.
धनश्री जाधव हिला कोकणचे सुपुत्र श्री.शरद भावे (जनसेवक)/विशेष कार्यकारी अधिकारी ( SEO )महाराष्ट्र शासन,प्रभाग संघटक (रस्ते साधन सुविधा व आस्थापना एन वॉर्ड विभाग),मनसे मा.शाखा अध्यक्ष १३२,दापोली तालुका सह संपर्क अध्यक्ष-महाराष्ट नवनिर्माण सेना यांच्यासह त्यांचा संपूर्ण समुहातर्फे अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.