शिवजयंती निमित्त सारडे ग्रामपंचायत तर्फे कोरोना योद्धयांचा सत्कार

uran13
उरण (विठ्ठल ममताबादे ) : 19 फेबृवारी-अखंड हिंदूस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन उरण तालुक्यातील सारडे ग्रामपंचायतीच्या वतीने मोठ्या  उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यात आली
uran10
 कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या कठीण काळात ग्रामपंचायतीस सहकार्य करणाऱ्या  तसेच या संकट समयी  गावातील प्रत्येक  घरोघरी जाऊन गावातील जेष्ठ नागरीक तसेच तसेच घरातील प्रत्येक सदस्यांची  आरोग्य  तपासणी करणाऱ्या प्राथमिक  शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला म्हात्रे मँडम,शिक्षक   नऱ्हे सर ,कौशिक ठाकुर ,समृद्धी वऱ्हाडी  मँडम,आशावर्कर आशा  पाटील,अंगणवाडी सेविका पुष्पलता पाटील ,उपेंद्र ठाकुर,भावना पाटील, कल्याणी भोईर, आरोग्य सेवक डाँ.स्वप्निल पाटील, तलाठी अनिलकुमार जोशी,कोतवाल आदेश गावंड,ग्रामसेविका संचिता केणी,   तसेच लाँकडाऊनच्या काळात गावातील गरीब व गरजू जनतेसाठी मोफत अन्नधान्य  , भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणाऱ्या ,मास्क वाटप ,अर्सेनिक गोळ्या ,टिसीएल फवारणी आदी करणाऱ्या  गावातील सेवाभावी संस्था सारडे विकास मंच, श्री राधाकृष्ण सांस्कृतिक सामाजिक मंडळ, इन लाईन शिपिंग तसेच उरण पंचायत सभापती तथा शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी  अँडव्होकेट सागर कडु ,काँग्रेसचे नेते महेंद्र घरत, शिवसेना पदाधिकारी मनोज पाटील,
रोशन पाटील,कुणाल पाटील, हेमंत पाटील,रुपेश ज.पाटील,प्रेमनाथ भोईर, लाँकडाऊन  काळात शासना कडुन वारंवार येणाऱ्या सुचना व आदेश स्पीकर द्वारे  लोकांपर्यंत पोहचवणारे सुशांत माळी, गावात घरोघरी जाऊन लोकांना जागरुक तसेच गावंबदीच्या काळात  गावसेक्रेटरी ,गावातील  गाव कमेटीचे  सर्व पंच ,पोलिस पाटील घनःश्याम पाटील आदी व्यक्तींनी ग्रामपंचायतीस चांगल्या प्रकारचे सहकार्य केले त्याबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच  चंद्रशेखर पाटील, उपसरपंच-अपेक्षा पाटील,माजी उपसरपंच श्यामकांत पाटील ,माजी उपसरपंच  भारती पाटील,सदस्य भार्गव म्हात्रे ,समीर पाटील ,क्षमा पाटील ,भगवती पाटील यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान पत्र देऊन कोरोना योद्धा म्हणून वरील सर्वांचा सन्मान करण्यात आला.या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर महिला सक्षमीकरण अंतर्गत  गावातील 16 महिला बचत गटातील महिलांसाठी प्रशिक्षणाविषयी माहिती देण्यात आली तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.निमित्ताने ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या कडून   सर्व महिलांना गुलाब पुष्प व एक छोटीसी वस्तुरुपी भेट देण्यात आली.या कार्यक्रमाला  गावातील 150 महिला तसेच बहुसंख्य ग्रामस्थ  उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामपंचायतीच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सारडे ग्रामपंचायतीचे कौतुक व अभिनंदन केले.या  कार्यक्रमाचे सुंदर  संचालन सुशांत माळी सर तसेच दीपक पाटील यांनी केले.