उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण शहरातील शिवराज युवा प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून द्रोणागिरी गडाच्या पायथ्याशी शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात, आनंदात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदेश भाई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर द्रोणागिरी गडावर जाऊन महादरवाजाचे पूजन करण्यात आले.गड फेरी करून गडाचा इतिहास लोकांना सांगण्यात आला.गडावर जाणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला गडाच्या पायथ्याजवळ पाणी आणि रियल ज्युसचे बॉटल वाटण्यात आले. शिवकार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, श्रम दनातून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व मावळ्यांचे शिवराज युवा प्रतिष्ठान संस्थे तर्फे आभार मानण्यात आले. यावेळी शिवराज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश भाई ठाकूर, गड संवर्धन संस्थेचे अध्यक्ष शिवभक्त गणेश तांडेल,द्रोणागिरी गड संवर्धन अध्यक्ष गणेश माळी यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.