शिवसेनेच्या मागणीला यश, दणक्यानंतर कामाला सुरुवात

pl
पनवेल (संजय कदम) : कामोठे वसाहतीमधील सेक्टर-१८ गणपती मंदिर जवळ चेम्बर दुरुस्तीचे कामासाठी सहा महिने सिडकोसोबत पत्रव्यवहार करूनही सिडकोचे अधिकारी दाद नव्हते मात्र शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेताच सिडको जाग आली आणि काम सुरुवात करण्यात आले.
शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कामोठे उपशहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी सेक्टर-१८ गणपती मंदिर जवळ चेम्बर दुरुस्तीचे कामासाठी सहा महिने सिडकोसोबत पत्रव्यवहार केला. मात्र सिडकोचे अधिकारी दाद नव्हते मात्र शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घेताच सिडको जाग असून सदर कामाला सिडकोकडून सुरुवात करण्यात आले आहे.
याबद्दल शिवसेना तर्फे सिडको अधिकारी श्री पांडुळे यांचे आभार मानण्यात आले. यावेळी बोलताना सचिन मनोहर त्रिमुखे यांनी सांगितले कि, ह्या कामामध्ये शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, शिवसेना कामोठे शहरप्रमुख राकेश गोवारी, प्रभाग क्रमांक -13 चे उप शहर प्रमुख, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, विभाग संघटक,शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख, गटप्रमुख आणि जेष्ठ शिवसेनिक यांचा हातभार लागला असून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हे काम होत असल्याचे नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *