पनवेल (संजय कदम) : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्यावतीने पनवेल तालुक्यातील विचुंबे, सुकापुर आणि देवद येथील 40 ज्येष्ठ नागरिकांना शिर्डी साईबाबा चे दर्शन घेण्यासाठी आज पनवेल होऊन शिर्डीला बस रवाना झाली.
यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना फळे व बिस्किटे वाटप दुपारच्या जेवणाची सोय डॉ. आशिष बांदेकर यांनी केले तर शाखाप्रमुख हनुमंत खंडागळे चहा नाश्त्याची सोय केली तर आयोजक शिवसेना उप विभाग प्रमुख जयंत पाखरे, विशाल भोईर विभाग प्रमुख बिपीन झुरे पुरुषोत्तम पाटील, जयेश पाटील, हेमंत म्हात्रे, अनंत न्हवकर संघटिका शारदा पाटील व महिला सेवेकरी या बस सोबत गेले आहेत.