उरण ( विठ्ठल ममताबादे ) : गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक असा नारा देत शिवसेनेच्या वतीने पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून उरण शहरात तेरापंथी सभागृह वाणी आळी येथे शिवसेनेतर्फे महिला मेळावा, हळदी कुंकू कार्यक्रम, कोरोना योद्ध्यांचा सत्कार तसेच शहर व ग्रामीण भागातील महिला कार्यकर्त्यांची विविध पदावर नवनियुक्ती आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईचे महापौर किशोरीताई पेडणेकर, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, महिला रायगड जिल्हा संघटक रेखाताई ठाकरे, जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर,ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख रमेश म्हात्रे, गटनेते गणेश शिंदे, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, संघटक बी एन डाकी,शहर प्रमुख विनोद म्हात्रे, गणेश घरत आदी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर महिला मेळावा, हळदी कुंकू कार्यक्रम, कोरोना योद्ध्यांचा सत्कार व ग्रामीण तसेच शहरी भागातील कार्यकर्त्यांचा पक्षाच्या विविध पदावर नियुक्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादाने संपन्न झाला.
यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या ट्रॅफिक महिला पोलीस, महिला सफाई कामगार, आशा वर्कर, महिला सामाजिक कार्यकर्त्या आदींचा कोरोना योद्धा म्हणून पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्येकाला एक भेट म्हणून कापडी पिशवी देण्यात आले.शिवसेने तर्फे महिला मेळावाही भरविण्यात आले या मेळाव्यात उपस्थित महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांना महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये शिवसेना पक्ष अधिक मजबूत, बळकट करण्याच्या सूचना किशोरीताई यांनी दिल्या.उरण मधील शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते चांगले व योग्य रीतीने काम करत असल्याचे सांगत महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी उरण मधील महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी उरण शहर व ग्रामीण भागातील महिला कार्यकर्त्यांचे शिवसेना पक्षाच्या विविध पदावर नवनियुक्ती करण्यात आली.
यावेळी ममता पाटील -उपजिल्हा संघटक, भावना कैलास म्हात्रे -महिला तालुका संघटक, सुजाता गायकवाड -महिला तालुका संघटक, प्रणिता म्हात्रे -तालुका संपर्क प्रमुख, ज्योती म्हात्रे -विधानसभा संघटक,वीणा तलरेजा, नगरसेविका विद्या म्हात्रे, वंदना पवार, मेधा मिस्त्री, श्रद्धा सावंत आदी शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना माळी, प्रस्तावना भावना म्हात्रे तर आभार प्रदर्शन नगरसेविका वर्षा पाठारे यांनी केले.