शिवाजी शिंदेंच्या मागणीला यश !

matheran-rishwa1
माथेरान( मुकुंद रांजाणे) : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार माथेरान मध्ये तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा सुरू झाल्यामुळे पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. परंतु या महत्वपूर्ण सेवेचा लाभ स्थानिकांना सुध्दा मिळावा यासाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवाजी शिंदेंनी प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना लेखी निवेदन दिले होते त्यावर चर्चा करून सुरेखा भणगे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन उद्यापासून दि. (५) ही सेवा स्थानिकांना उपलब्ध केली जाईल त्याचप्रमाणे सकाळी लवकर  काॅलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज दहा रुपयांत येऊन जाऊन ही सुविधा दिली जाईल अशी ग्वाही सुरेखा भणगे यांनी दिल्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 ———————————–
तीन महिन्यांच्या या पायलट प्रोजेक्ट मध्ये स्थानिकांना या ई रिक्षाचा किती लाभ होत आहे हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे त्यांनाही त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी उद्या दि.५ पासून तीन रिक्षा स्थानिकांच्या सेवेत रुजू होतील ज्यावेळी स्थानिकांची संख्या कमी असेल त्यावेळी त्या रिक्षा पर्यटकांसाठी वापरण्यात येतील.
—सुरेखा भणगे (शिंदे), प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद
———————————–
नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या हंगामात ई रिक्षेच्या सेवेमुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती त्यामुळे स्थानिकांना तासंतास गर्दीत ताटकळत उभे रहावे लागले होते. माथेरान करांच्या संघर्षातुन ही सुविधा निर्माण झाली आहे त्यामुळे या सेवेचा लाभ त्यांनाही मिळाला पाहिजे.ही बाब आम्ही निवेदनाद्वारे प्रशासक सुरेखा भणगे यांच्या निदर्शनास आणून दिली असून त्यांनी याबाबत सकारत्मक प्रतिसाद दिला आहे.
—शिवाजी शिंदे, माजी नगरसेवक माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *