भाकरवड (जीवन पाटील) : अलिबाग तालुक्यातील श्रीगाव चे अशोक विठोबा पाटील यांचे शुक्रवार दि 8 डिसेंबर 2022 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले.
अत्यंत शांत सदा मितभाषी असा त्यांचा स्वभाव होता आध्यात्मिक आवड असलेल्या स्व अशोक पाटील यांना भजनाची आवड होती गावात होणाऱ्या आध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असत तर दत्त प्रासादिक भजन मंडळाचे आजीवन सदस्य होते . स्व पाटील यांची दुःखत बातमी कळताच संपूर्ण श्रीगाव पंचक्रोशीवर शोकांतिका पसरली.
आपल्या एम एस इ बी च्या खात्यात जवळजवळ 35 वर्षे पूर्ण करीत प्रथम साई, पेण,वाशी, रावे दादर,अलिबाग, श्रीगाव अशा ठिकाणी वायरमन म्हणून सेवा केली त्यांना श्रीगाव गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पार्थिवावर पुष्पहार अर्पण केले तर उपस्थित सर्वांच्या वतीने सुरेश पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.त्यांचे उत्तर कार्य दहावा रविवार दि18 डिसेंम्बर रोजी घरच्या स्वरूपात तर तेरावे बुधवार दि 21 डिसेंबर 2022 रोजी राहत्या घरी होणार आहे त्या वेळी ह भ प रायगड भूषण विद्याधर महाराज निळकर यांच्या किर्तनरुपी सेवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या पच्यात पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा मोठा परीवार आहे.