श्रीवर्धनमध्ये उभारणार रायगड जिल्ह्याचे एज्युकेशन हब : पालकमंत्री आदिती तटकरे

श्रीवर्धन(विजय गिरी ) : गोखले एजुकेशन सोसायटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीवर्धन मध्ये शिक्षक दिना निमित्त तेजस्विनी पुरस्कार व सरस्वती भूषण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या रायगडच्या पालकमंत्री नाम .अदितीताई तटकरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, कि अँड्रॉइड मोबाइलच्या आधीचे शालेय जीवन खूपच सुंदर होते. रायगड जिल्ह्याचे एजुकेशनल हब श्रीवर्धन मध्ये उभारणार. या वेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी प्राचार्य श्रीनिवास जोशी, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जि .प .सदस्य प्रगती अदावडे ,पं .स .सदस्य मंगेश कोमनाक, आदी मान्यवर उपस्थतीत होते. पुढे मनोगत व्यक्त करताना अदितीताई म्हणाल्या की या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले पण याच सोहळ्यात मला तेजस्विनी पुरस्काराने गौरवण्यात आले हा मला सुखद धक्का आहे. आपल्या हस्ते चांगल्या व्यक्तींचा सन्मान करता आला याचा अर्थ आपण योग्य मार्गाने जात आहोत याचा अभिमान आहे.

उच्च शिक्षितांनी राजकारणात यावे पण शैक्षणिक कार्यात राजकारण आणू नये. बालपणीचे शालेय किस्से सांगताना शिक्षकांबरोबर वडील आजी आणि आई यांनी दिलेल्या संस्कारामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचल्याचे सांगितले. यश गाठल्यानंतरही जमिनीवर पाय राहण्यासाठी जीवन प्रवास डोळ्यासमोर नेहमीच राहायला हवा. कै .राऊत साहेब तसेच कै अंतुले साहेबांनी तसेच तटकरे साहेबानी श्रीवर्धनचे नाव उंचावले आहे ते अधिकाधिक उंचावून शैक्षिणिक क्षेत्राची प्रगती साधायची आहे. श्रीवर्धनचा शैक्षिणिक दर्जा उंचावण्याचा आहे. विविध सेवाभावी संस्था राष्ट्रवादी वेल्फेर ट्रस्ट व शासनाच्या वतीने विद्यालयाने मदत करणार असल्याचे जाहीर करून, श्रीवर्धनच्या विद्यार्थ्यांसाठी यु.पी.एस.सी. आणि एम.पी.एस.सी. च्या अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध करून देणार, असे सांगून श्रीवर्धनच्या विद्यार्थी श्रीवर्धन मध्येच प्रांताधिकारी,तहसीलदार तसेच विविध शासकीय पदांवर पाहायला मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. श्रीवर्धनमधल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य व मदत करणार असल्याचे जाहीर केले. पुरस्कार वितरण सोहळ्यात नाम. अदितीताई नां प्राचार्य श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते शाल श्रीफळ मानपत्र सन्मानचिन्ह देऊन तेजस्विनी पुरस्काराने गौरविण्यात आले .

नाम .अदितीताईंच्या हस्ते शिक्षकांना सरस्वती भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सोहळ्यात प्लॅटिनियंम व कोकणरत्न पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सोहळ्याचे प्रास्ताविक प्राचार्य जोशी यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी निसर्ग चक्रीवादळात विद्यालयाचे नुकसान झाले होते, तेव्हा अदितीताईंना संपर्क केला होता. अदितीताईंनी तात्काळ 5लाखाची मदत केल्याचे सांगून अदितीताईंची व त्यांच्या कार्यतत्परतेची स्तुती केली. उपप्राचार्य निलेश चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. सोहळ्याचे उद्घाटन नाम. अदितीताई तटकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यपिका नाझरे व प्राद्यापक जावळेकर यांनी केले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता करण्यात आली. सोहळा आटोपल्या नंतर अदितीताईनीं शासकीय अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वडघर पांगळोली येथे कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रस्तावित जागेची पाहणी केली .