श्रीवर्धन(विजय गिरी ) : शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या माध्यमातून श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक तपासणीसाठी श्रीवर्धनमध्ये ९२ पथके तैनात करण्यात आले असल्याची माहिती गट विकास अधिकारी भोगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पंचायत समिती सभापती बाबुराव चोरगे सदस्य मंगेश कोमनाक आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने योजलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मिशनचा १२ सप्टेंबर रोजी परिपत्रक निघाला असून श्रीवर्धन पंचायत समितीच्या माध्यमातून १७ सप्टेंबर रोजी अमलबजावणी करण्यात आली असून उद्या पासून तालुक्यातील विविध गावात तपासणीसाठी यंत्रणा सुरू केली जाणार आहे. श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक गावात घरो घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोणाला आजार आहेत का? त्याच बरोबर प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची ऑक्सिजनची व शारीरिक तापमानाची मात्र तपासली जाणार आहे. व याची संपूर्ण माहिती शासनाच्या अँप मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात देखील कोविड झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक शिक्षक, एक अंगणवाडी सेविका, एक आशा वर्कर अशी तिघांच पथक असे ९२ पथक तैनात करण्यात आले आहेत. एक पथक एक दिवसाला ५० कुटूंबाच्या तपासणी करणार असल्याचा लक्ष ठेवण्यात आला आसलेल्याची माहिती गटविकास अधिकारी श्री. बाळासाहेब भोगे यांनी दिली.