PEN टाइम्स ऑनलाइन टीम : सध्या पेन आणि कागद कालबाह्य होऊ लागला आहे. शाळा, कॉलेजनंतर याचा वापर खुपच कमी होत आहे. बहुतांश कार्यालयांमध्ये कागद वापरणे टाळले जाते. संगणकावर टायपिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही लोक तर रोज ८ ते ९ तास संगणकावर टाईप करत असतात. या लोकांसाठी धोक्याचा इशारा असून त्यांना भविष्यात कार्पल टनल सिंड्रोम होऊ शकतो. या आजाराची कारणे, लक्षणे आणि उपाय आपण जाणून घेणार आहोत.
ही आहेत लक्षणे :-
१ हातात कमजोरी येणे
२ पेन पकडण्यास त्रास होणे
३ हात दुखणे
४ हात सून्न होणे
हे उपाय करा :-
१ हातांचा व्यायाम करा
२ टायपिंग करताना एक तासानंतर ५ मिनिटांचा ब्रेक घ्या
३ रिस्ट बॅन्ड वापरु शकता
हे लक्षात ठेवा :-
१ टायपिंग काही काळानंतर धोकादायक ठरु शकते.
२ पाच वर्षांपर्यंत रोज ५ ते ६ तास टायपिंग केल्यास मनगटाला, अंगठ्याला, अंगठ्याच्या बाजूच्या बोटाला आणि तिसऱ्या बोटाला त्रास होऊ लागतो.
३ मनगटातील मीडियन नस दबल्याने ही समस्या निर्माण होते.
४ तरुणांमध्ये ही समस्या जास्त आढळत आहे.
५ दिवसभर लॅपटॉपवर काम आणि सोशल मीडियाचा वापरचा हा परिणाम आहे.
६ अठरा ते पंचवन्न वर्षांच्या लोकांमध्ये हा त्रास जास्त आढळतो.