PEN टाइम्स ऑनलाइन टीम : पालघर येथील रेणुका माता मंदिरात अर्ध नग्न अवस्थेतील चोरट्याने चोरी करून पोबारा केला आहे. चोराने दानपेटीतील रोकड आणि चांदीचे दागिने लंपास केले असून पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदिरातील दोन दान पेट्यांमध्ये 70 हजार रुपये रोख व देवीला घातलेला चांदीचा हार असा एकूण 90 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. मंदिरातील चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. हा चोरटा चोरी करून जात असताना देवीच्या पाया पडला सीसीटीव्ही कॅमेरा कडे पाहून त्याने हात हलवत बाय-बाय ही केले.
घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्हीच्या आधारावर पुढील तपास सुरू आहे.