पेण (राजेश प्रधान) : अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध असलेले चौल भोवाले येथील दत्त मंदिरात चोरटयांनी सुमारे 40 किलो चांदी चोरून नेण्याचा संतापजनक प्रकार केला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, चौल भोवाले येथील दत्त मंदिरात गुरुवारी रात्री चोरट्यांनी प्रवेश केला. मंदिराच्या गाभाऱ्यांमधील मुख्य मूर्तीच्या पाठीमागील भिंतीवर चांदीचे पत्रे लाऊन नक्षीकाम केले होते. ते पत्रे उपटून सुमारे ४० किलो चांदी अज्ञात चोरटयांनी चौल दत्त मंदिरातुन लंपास केली आहे. गुरुवारी रात्री दत्त मंदिरात चोरी झाल्याने भाविक व ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
घटनास्थळी पोलीस तैनात असून चोरट्यांचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी देविदास मुपडे आणि त्यांचे सहकारी यांच्या मार्फत केला जात आहे.