संदेश चौलकर यांचा जे.जे.रूग्णालयातील सेवाभावी कार्याचा सेवानिवृत्तीप्रसंगी गौरव

poladpur-x
पोलादपूर(शैलेश पालकर) : रायगड जिल्ह्यातील रूग्णांची विशेष काळजी घेण्यासाठी सहकाऱ्यांना प्रवृत्त करणारे सर जे. जे. रुग्णालयातील क्ष-किरण विभागातून वरिष्ठ क्ष-किरण तंत्रज्ञ संदेश चौलकर यांची तब्बल तीस वर्षांची शासनसेवा नियत वयानुसार दि.31 डिसेंबर 2022 संपुष्टात आली. यावेळी त्यांच्या सर जे.जे.रूग्णालयातील वरिष्ठांकडून सेवाभावी कार्याचा सेवानिवृत्तीप्रसंगी निरोपावेळी गौरव करण्यात आला.
वरिष्ठ क्ष-किरण तंत्रज्ञ संदेश चौलकर यांच्या निरोपावेळी विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ.अविनाश गुट्टे, डॉ. शरद घाटगे व इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे सर्व वरिष्ठ व कनिष्ठ क्ष-किरण तंत्रज्ञ, सहाय्यक, स्टाफ नर्स, सिस्टर, कक्षसेवक, सफाई कामगार, उपस्थित होते.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करणारे मार्गदर्शक, सतत जनसामान्यांसाठी कार्यरत म्हणून त्यांची ख्याती आहे. यासाठी त्यांचे विविध स्तरांवर सत्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. कोविडच्या काळात केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याबद्दल त्यांन ‘कोविड योध्दा’ म्हणून सुध्दा गौरविण्यात आले आहे. याशिवाय रक्तदान शिबीर, विविध प्रकारचे शिबीरे त्यांचे समाजकार्य उल्लेखनीय आहे. विविध कामांत हिरिरीने सहभागी होत असल्याने संदेश चौलकर हे समाजसेवक म्हणून सुध्दा प्रसिध्द आहेत. जे.जे.रूग्णालयामध्ये वरिष्ठ क्ष-किरण तंत्रज्ञ संदेश चौलकर यांना अभिनेता व गायक म्हणूनही ओळख प्राप्त असून यांनी आतापर्यंत 10 ते 15 मालिकांमध्ये छोटीमोठी भुमिका साकारलेली आहे. यावेळी निरोपाचे भाषण करताना वरिष्ठ क्ष-किरण तंत्रज्ञ संदेश चौलकर यांनी आपण जरी शासनसेवेतून निवृत्त झालो तरीही रुग्ण व नातेवाईकांना मदत करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *