पेण (सुनिल पाटील ) : कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या व शैक्षणिक हिताच्या दृष्टीने ऑनलाईन शैक्षणिक कार्यक्रम घेण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाच्या आहेत. त्याअनुषंगाने खास इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल जि. रायगड व शिक्षण विभाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक शास्त्र या विषयाच्या पूर्वतयारीसाठी “सरावातून यशाकडे” हा कार्यक्रम तयार केला आहे.
सामाजिक शास्त्र विषय इतर विषयांइतकाच महत्वाचा आहे.स्पर्धापरिक्षांत त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांची गुणांची सरासरी वाढवण्याच्या दृष्टीने व जबाबदार नागरिक घडवण्यासाठी या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे .
या कार्यक्रमात अनुभवी तज्ञ मार्गदर्शक यांनी बोर्डाच्या धर्तीवर तयार केलेल्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन पद्धतीने सोडविता येतात. याद्वारे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता वाढविणे व जबाबदार नागरिक घडवून आणणे हा प्रमुख उद्देश या कार्यक्रमाचा आहे.
याचसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रायगड च्या प्राचार्या चंद्रकला ठोके, भाऊसाहेब थोरात शिक्षणाधिकारी यांच्या प्रेरणेने श्री.संतोष दौंड अधिव्याख्याता DIET पनवेल ,रायगड व सौ .सोनल गावंड विषय सहाय्यक यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
श्री संतोष म्हात्रे,सौ.स्नेहा गाडे, सौ.सुप्रिया लांडगे,श्री.विश्वास वाघमारे,श्री.संजय वझरेकर,श्री.विजय सावंत,सौ.सुवेगा पाटील,सौ.संगीता भोईर यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. त्यास गणेश कुताळ विषय सहायक व सौ. ज्योत्स्ना बाक्रे, श्री.राजेश पाटील,श्री.प्रशांत दळवी व श्री.दीपक पवार यांचे तांत्रिक सहाय्य लाभले आहे. त्याचसोबत 15 तालुक्यातील विषय साधनव्यक्ती सौ.अर्चना भोईर पनवेल, दत्तात्रेय सातमकर मुरुड, दिलीप पाटील सुधागड, मनीषा पाटील उरण, पालवे खालापूर, पुरुषोत्तम म्हात्रे पेण ,राजेंद्र पाटील माणगाव ,रामचंद्र ऐनकर कर्जत, संदीप भोंडकर मसळा, संगिता पुरी महाड, स्वप्नील म्हात्रे तळा, विजया पाटील अलिबाग, गणेश सावंत श्रीवर्धन, मंगेश चिले पोलादपूर व मनीषा पाटील रोहा हे आपल्या तालुक्यातील प्रत्येकमाध्यमिक शाळेपर्यंत उपक्रम पोहोचवून मार्गदर्शन करत आहेत.
” सरावातून यशाकडे” उपक्रमात आत्ता पर्यंत 7 सराव चाचण्या google test द्वारे घेण्यात आला . प्रत्येक चाचणी इयत्ता 10 वी च्या 12,000 विद्यार्थ्यांनी सोडवली आहे…