नवी दिल्ली : अर्थसंकल्पानंतर आता सर्वसामान्यांना मोठा झटका बसणार आहे. काही दिवस शांत राहिल्यानंतर आता गुरुवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डीजलच्या दरात प्रत्येकी प्रति लिटर 35-35 पैशांची वाढ केली आहे. याच प्रकारे एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याच बरोबर दिल्ली येथे पेट्रोलचा दर आता प्रति लिटर 86.65 रुपयांवर पोहोचला आहे.
नकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी इन्फ्रा सेस लावण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्या ग्राहकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे सरकारने म्हटले आहे.
LPG सिलिंडरचा दर….
इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना 14 किलोच्या नॉन सब्सिडी घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. एलपीजी सिलिंडरचे दर 25 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे आता दिल्लीत सिलिंडरचा दर 719 रुपये, कोलकात्यात 745.50 रुपये, मुंबईत 710 तर चेन्नईमध्ये 735 रुपयांवर पोहोचला आहे.