सहकारी संस्थांच्या वैधानिक लेखापरिक्षणास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

ठाणे : कोविड-१९ संसर्गाच्या प्रार्श्वभुमीवर सहकारी संस्थांचे सन २०१९-२० चे वैधानिक लेखापरिक्षणास शासनाकडुन दिनांक ३१ डिसेंबर२०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असूनसर्व सहकारी संस्थांनी त्यांचे सन २०१९-२० चे वैधानिक लेखापरिक्षण बंधनकारक करण्यात आलेले आहे.असे जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-1 सहकारी संस्था संदानंद वुईके यांनी कळविले आहे.

 ज्या सहकारी संस्थात्यांचे सन २०१९-२० चे वैधानिक लेखापरिक्षण दि. ३१ डिसेंबर २०२० पुर्वी पुर्ण करून घेण्यास असमर्थता अथवा टाळाटाळ करतील किंवा संबधित लेखापरिक्षकांस विहीत मुदतीत लेखापरिक्षणासाठी दप्तर उपलब्ध करुन देण्यास कुचराई करतील अशा सर्व सहकारी संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम१९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार संस्था नोंदणी रदद करणेसंचालक मंडळ बरखास्त करणेसंबधित अधिकारी/पदाधिकारी पदावर राहण्यास अपात्र ठरणे तसेच संबधितांवर उचित कायदेशिर शिक्षा व आर्थिक स्वरूपाचा दंड होऊ शकतो ई. स्वरुपाची निबंधकांकडून कारवाई करण्यात येईल.

संबधित नियुक्त लेखापरीक्षक यांनी (सनदी लेखापाल/परिव्यय लेखापरीक्षक/सनदी लेखापाल फर्म/प्रमाणित लेखापरिक्षक) त्यांची नियुक्ती झालेल्या संस्थेचे सन २०१९-२० लेखापरिक्षण विहीत मुदतीत (दि.३१.१२.२०२० पुर्वी) पुर्ण करण्यात टाळाटाळ अथवा कुचराई केल्यास तसेच सबळ कारणाशिवाय विहित मुदतीत पुर्ण न केल्यास संबधित लेखापरिक्षक सहकार कायदा व नियमामधील तरतुदीनुसार उचित कारवाईस पात्र राहतील. ही बाब संबधित लेखापरिक्षकांनी गांभिर्य घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशा वैधानिक लेखापरिक्षकांचे नाव सहकार खात्याचे लेखापरिक्षक नामतालीकेवरून (ऑडीटर पॅनल) कमी करणे बाबत कारवाई करण्यात येईल.