एकदा खुप cute व्हिडीओ पाहिला fb वर…
एक छोटीशी बहिण तिच्या भावाचा अभ्यास घेतेय.. त्याच्या वही वर बोट ठेऊन नीट लक्ष दे सांगतेय.. मधेच त्याला फटके देतेय.. वही वर बोट आपटतेय..
खुप cute moment..!!!
शेवटी भावाची काळजी बहिणीलाच..!!! 😄😄
पण…
एका क्षणी हा सुद्धा विचार आला मनात.. की आजकाल ची ही लहान मुले इतकी active, इतकी हुशार …
ह्या वयात ही किती समंजस आहेत…
कुठून शिकत असतील हे एवढं सगळं?….
हम्म्म्म…. आजुबाजुच्या सगळ्यांना बघून..!!!
आपल्या घरातल्या रोज दिसणाऱ्या माणसांना बघून!
आता ही चिमुकली… हिला कुणी सांगितले असेल.. की अभ्यास करताना वहीत दाखवून फटके मारायचे..!!!
म्हणजे नक्कीच तिने कुणाचे तरी अनुकरण केले असेल.. कदाचित तिच्या भावाचा अभ्यास घेणाऱ्या व्यक्तिचे..!! ते वडील असु शकतात.. किंवा आई..!!! किंवा तसंच घरातलं दुसरं कुणी..!!!
ज्यांनी अभ्यास घेताना, कदाचित एखादं गणित सोडवता आलं नसेल त्या छोट्या दादा ला.. म्हणून फटके दिले असतील.. थोबडित मारलं असेल.. आणि हे ह्या चिमुकलीने पाहिले असेल.. कदाचित.. नेहमी घडणारी घटना असावी ही.. म्हणून तर सगळ्यांनी अगदी सहज घेतलं हे.. !!!
कदाचित प्रत्येकाच्या घरात घडणारी घटना असावी.. !!!
पण आता हे बदलायला हवं.. एखादी गोष्ट समजत नसेल तर प्रेमाने समजवून सांगण्याची कला आपल्या सर्वांना च आत्मसात करायला हवी.. तर च आपल्या पुढची पिढी न भीता आपल्या जवळ त्यांचे problems घेऊन येऊ शकेल.. हक्कानी… विश्वासानी.. मग ते problems अभ्यासातले असो, वा आयुष्यातले…!!!
कदाचित हे माझे सगळे फक्त तर्क ही असु शकतील.. मी जे म्हंटलं ते काही जणांनी अनुभवले असेल.. देवाच्या कृपेने काहींना ह्याचा गंध सुद्धा नसेल.. पण जे सुज्ञान आहेत.. ते ही गोष्ट सहज समजू शकतात.. आणि स्वतः मध्ये व इतरांमध्ये हा बदल घडवून आणु शकतात..
हा बदल घडावा.. एवढीच इच्छा..!!!
– के. एस. अनु