नेहमी आपण म्हणतो, स्त्रिया नाजुक असतात.. त्या थकतात…
पण..
पुरुष ही थकतात हे आज नव्याने जाणवलं!!!
साधी घटना होती..
ट्रेन नी प्रवास करतेय.. सगळीकडे गर्दी आहे.. कोणी कामावरुन आलेय, कोणी कॉलेज करून.. कोणी घरी चाललंय, कोणी कुठे तर कोणी कुठे…
प्रत्यक्षात गोष्ट एक च.. सगळे ट्रेन नी प्रवास करतोय!
मी ही माझ्या एका मीटिंग साठी मुंबई वरुन पुण्याला आले.. मीटिंग झाली.. परत निघाले!
एकाच दिवसात मुंबई – पुणे – मुंबई दौरा! कित्येक लोक हे रोज करत असतील.. माझं ही हे नेहमीचे च आहे!
पण आजचा अनुभव लिहावासा वाटला…
गोष्ट अगदी छोटी.. गोष्ट म्हणण्या पेक्षा घटना म्हणू… घटना अगदी छोटी.. दोन मित्र ट्रेन मधे गर्दित उभे आहेत.. आणि त्यातला एक जण आजारी असल्याने दूसरा मित्र त्याला खाली बसावतो… हो.. खाली… जिथुन लोकांची ये जा होते.. त्या पायवटे वर..! तो ही तब्येत बरी नसल्याने बसतो..
साधी घटना.. आणि मग नजर हळूच दूसरी कडे वळते.. पायवटे वर असणारा आणखी एक पुरुष.. खाली बसला.. चेहरा पूर्ण थकलेला… जेव्हा बसला तेव्हा त्याला जरा आराम वाटला असावा..
सहज दुसऱ्या बाजूला पाहिले.. तिथे ही एकाने खाली बसून घेतले…
खरंच.. तेव्हां जाणवलं… आपण पुरुषांची एक ना इमेज बनवून ठेवतो.. परफेक्ट पुरुष असण्याचा एक कोट शिवुन ठेवतो.. आणि तोच प्रत्येकाला घालून पाहतो..
त्या कोट मधे जर तो नीट बसला.. तर तो पुरुष! खरंच.. अशीच आपली विचारधारा झाली आहे..
तो खरा पुरुष.. नेहमी परिवाराच्या गरजा पूर्ण करतो.. मुलांना हवं ते घेऊन देतो.. बायको च्या गरजा पूर्ण करतो.. घरा साठी वेळ देतो.. आणि ऑफिस मधे ही वेळेत सगळ काम करतो.. बॉस चा ओरडा.. कामचं टार्गेट.. सगळ सगळ करतो.. आणि तरी ही कधी रागवत नाही.. रुसत नाही.. चिडचिड करत नाही…
तो पुरुष!
अरे पण आपण हे विसरतो.. की तो ही एक माणूस च आहे.. त्याला ही भावना आहेत.. त्याची ही श्रम करण्या ची एक कैपेसिटी आहे.. त्याचा ही देह थकतो…!
ही गोष्ट सगळेच विसरलेत असं नाही म्हणणार मी.. पण जे विसरलेत त्यांना आठवण करून द्यावी वाटली..
म्हणून हा लिहिण्याचा खटाटोप!
कदाचित जे विसरलेत.. त्यांना ह्या गोष्टी जाणवतील.. आणि .. ते प्रत्येकाला एक च कोट नाही घालणार..!!!
– के. एस. अनु