सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

uran13

उरण (विठ्ठल ममताबादे ) : सह्याद्री प्रतिष्ठान पुरस्कृत सहयाद्री विद्यार्थी अकादमी उरण विभागा तर्फे एक पाऊल शिक्षणाकडे या उपक्रमा अंतर्गत उरण तालुक्यातील कडापे गावातील जिल्हापरिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, रबर हे शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

या कार्यक्रमास सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी देवन ठाकूर, अलंकार ठाकूर, अभिषेक ठाकूर, समाधान नाईक, संदेश सांगडे, आदेश पाडेकर, ओमकार पाटील, मयुर टाकले, अवनी पाटील, सचिन ठाकूर, शाळेतील शिक्षक म्हात्रे सर व पाटील सर तसेच कडापे ग्रामस्थ उपस्थित होते. सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र राज्यात सर्वत्र गड किल्ल्यांचे संवर्धन, संरक्षणाचे काम चालू आहे. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उरण तालुक्यातील कडापे येथे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य अलंकार ठाकूर यांनी दिली.