पेण (संतोष पाटील) : अलिबाग तालुक्यांतील सांबरी येथे श्री धावेश्वर क्रिडा मंडळाचे वतीने सालाबाद प्रमाणे दि. 26 जानेवारी 2021 रोजी खुल्या गटाचे क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धचे उदघाटन अलिबाग मतदारसंघाचे माजी आ. पंडितशेठ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी रा.जि.प. सदस्या चित्रा पाटील, माजी सरपंच श्री. संदीप पाटील, संपादक श्री. सुदर्शन शेळके, संतोष पाटील, सुजन गदमळे, सुधीर शेळके, कृष्णा पाटील, दामोदर पाटील (गुरुजी), जगदीश शेळके तसेच इतर आजी-माजी ग्रा.प. सदस्य उपस्थित होते.
सांबरी हे अलिबाग तालुक्यांतील पोयनाड-नागोठणे रस्त्यावर वसलेले छोटेसे गाव आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल 26 जानेवारी निमित्ताने मर्यादित क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आमंत्रित संघानाच प्रवेश देण्यात आला आहे. सांबरी गाव शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. यामुळेच पाटील कुटुंबाचे सुध्दा या गावावर खूप प्रेम आहे. त्याचा प्रत्यय आला असून या स्पर्धेला अलिबाग मतदारसंघाचे माजी आ. पंडितशेठ पाटील हे आवर्जून उपस्थित राहिले व त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी बोलताना पंडितशेठ पाटील यांनी पोयनाड-नागोठणे रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले. माञ विरोधक त्यांच्या प्रयत्नांमुळे झाले असे खोटं बोलुन दिशाभूल करत आहेत. या भागाचा व मतदारसंघाचा विकास हा फक्त शेतकरी कामगार पक्षच करु शकतो असे सांगून त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.