पनवेल (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील नावडेगाव येथे घराच्या बाजुला असलेला खाडी किनारी साप चावल्यामुळे एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
रामआशिष छोटेलाल शर्मा (वय 27 वर्षे) याला त्याच्या घराच्या बाजुला असलेला खाडी किनारी साप चावला. त्याच्या मित्रांनी त्याला रिक्षातून उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केले होते परंतु दवाउपचार चालु असतांना त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.