माथेरान ( मुकुंद रांजाणे ) : पर्यटनस्थळ माथेरान मध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने याचा पर्यटनावर परिणाम होत असल्यामुळे विजेच्या लपंडावा बाबतीत सामजिक कार्यकर्ते जनार्दन पार्टे यांचे अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
माथेरान येथील 22 केव्ही चा डिओ सतत जाऊन येथील विज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे त्याबाबत त्यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता पारधी यांच्या कडे तक्रार सादर केली आहे.
पाऊस नसताना देखील माथेरान येथील विज पुरवठा वारंवार खंडीत होता. येथील मुख्य बाजार पेठेतील 22 KV चा डिओ सतत उडत आहे. याचे मुख्य कारण हे आहे. की भूमिगत असलेली 22 KV च्या केबलचे इशुलेशन कोठे तरी कमजोर झालेले आहे. त्यामुळे सॉर्ट सर्किट होऊन सतत डिओ उडत आहे.
तेव्हा माथेरान येथील महा वितरण चे उप अभियंता पारधी यांनी हा दोष कोठे आहे याचा शोध घ्यावा आणि बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर क्ले पेव्हरचे ब्लॉक बसविण्या अगोदर अंडर ग्राउंड केबलचा दोष असल्यास त्वरित दुरुस्त करावा अशी रास्त तक्रार निवेदनात नमूद केली आहे.
यापुढे डिओ जाऊन विज पुरवठा वारंवार खंडित झाल्यास माथेरान येथील महा वितरण कार्यल्यावर धडक मोर्च्या काढण्यात येईल याची महावितरणच्या संबंधितत व वरिष्ठ अधिकारी वर्गाने नोंद घ्यावी असा इशारा सुध्दा जनार्दन पार्टे यांनी दिला आहे.