सावित्रीबाई फुले जयंती व रेझिंग डे निमित्ताने आरोग्य शिबाराचे आयोजन

aarogya
माथेरान (मुकुंद रांजाणे) : क्रांतीज्योत महीला विकास फाउंडेशन सह सुश्रुशा हॉस्पिटल, येरला मेडिकल कॉलेज, प्रहार ऑप्टिकल यांच्या माध्यमातून  आज दिनांक ४ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजे पर्यंत खांदेश्वर पोलीस ठाणे या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ,
ह्या शिबीर मध्ये ईसीजी , शुगर चेक , डोळे तपासणी , आयुर्वेदिक चेकअप, मुळव्याध चेकअप करण्यात आले व इतर आजारावर मार्गदर्शन  करण्यात आले,तसेच खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण श्री सुभाष कोकाटे, क्राईम पी,आय गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली  खांदेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत तेथील कर्मचारी स्टाफ व अधिकारी यांनी हा शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला, तसेच क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्ष सौ रुपालिताई शिंदे यांच्या सहकऱ्यांनी पूर्णपणे सहकार्य करत हा  आरोग्य शिबिर पार पाडला,
खांदेश्वर पोलीस स्टेशन मधील कर्मचारी सह शेकडो  स्थानिक नागरिकांनी ह्या शिबिरासाठी हजेरी लावली,  तसेच पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अनिल पाटील यांनी आरोग्य शिबीराला  भेट देऊन शुभेच्छा धील्या. ह्यावेळी *क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन* च्या अध्यक्ष सौ रुपालीताई शिंदे तसेच सुश्रुषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल* मधील डॉक्टर. ऋतुजा सुरेंद्र पाटील सौ रत्नमाला पाबरेकर (कॅम्प व्यवस्थापक)  सौ साक्षी पाटील (सिस्टर) मैनाज सिस्टर, पूनम सिस्टर,  *निकम परमार हॉस्पिटल* मधील डॉक्टर स्नेहा ननावरे, डॉक्टर अजिंक्य गुरव, सौ अश्विनी पाटील, सौ राधिका कोळी,  प्रहार ऑप्टिकलं मधील नारायण आडे,राजेश कंक, मुस्कान शेख यांचे विशेष कौतुक केले  व अशीच कौतुकास्पद कार्य आपणाकडून होत राहते म्हणून अग्रेसिव महिला सौ रुपालीताई शिंदे यांचे आभार व्यक्त करत कौतुक करण्यात आले, अशी कार्य आपणाकडून होत राहो म्हणून भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *