‘सावित्रीबाई फुले’ पुणे विद्यापीठातील महाविद्यालयांंना मोठा झटका, फी न भरल्यामुळे संपूर्ण निकालच अडवले

पुणे : विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरू शकले नाही त्यामुळे परदवीचे शेकडो विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेतआहे. ही घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने अनेक महाविद्यालयांतील पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांचे निकाल  प्रलंबित ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे

विद्यापीठाने पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी शुल्क भरण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. कोरोनामुळे परीक्षा शुल्क भरण्यास वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली आहे. त्याचदरम्यान करोनामुळे अंतिम वर्ष वगळता सर्व विद्यार्थ्यांचे निकाल मागील गुणांवरून निकाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शुल्कच भरले नाही, असं सांगितलं जात आहे.

विद्यापीठाने निकाल राखीव ठेवल्याने महाविद्यालयांना संबंधित विद्यार्थ्यांकडे शुल्क भरण्यासाठी पाठपुरावा करावा लागत आहे. शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १८  हजारांच्या आसपास असण्याची शक्‍यता आहे. जवळपास ६०  लाख रुपये परीक्षा शुल्क प्रलंबित असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ महेश काकडे यांनी दिली.