सुकेळीच्या राजाला विजांच्या कडकडात भावपुर्ण निरोप

सुकेळी (दिनेश ठमके) : नागोठणे परिसरासरासह ऐनघर विभागामध्ये शनि. दि.5 सप्टेंबर 2020  रोजी आगमन झालेल्या साखरचौथच्या गणपती बाप्पाचे विसर्जन रवि.दि.6 सप्टेंबर रोजी करण्यात आले. यामध्ये गावदेवी मित्र मंडळ सुकेळीच्या राजाला विजांच्या कडकडात भावपुर्ण निरोप देण्यात आला. अंत्यत शांततापुर्ण व उत्साही वातावरणात खैवाडी नदिवर भक्तीभावाने सुकेळीच्या राजाला निरोप देण्यात आला.
अंनत चतुर्दशीच्या बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर सर्वांना ओढ लागते ती लगेचच संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी येणा-या साखरचौथच्या गणपती बाप्पाची. यावर्षीसुद्धा साखरचौथच्या गणपती बाप्पाचे सुकेळी गावामध्ये कोरोनाच्या महाभंयकर संकटामुळे अगदि शांतमय आगमन करण्यात आले. यंदाचे सुकेळी गावातील साखरचौथच्या गणपतीचे हे 4 थे वर्ष आहे. दि.5 सप्टेंबर रोजी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्टा करण्यात आली. त्यानंतर रवि. दि.6 सप्टेंबर रोजी सांय 6 वाजण्याच्या सुमारास सुकेळीच्या राजाचे खैरवाडी नदिवर भावपुर्ण वातावरणात तसेच गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सर्वच गणेशभक्तांनी सुकेळीच्या राजाला निरोप दिला. यावेळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावत जणु काही बप्पाला निरोप दिला.