कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील गेल्या पंधरा तारखेला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 21 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत 12 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. यशस्वी विजयी झालेल्या सर्व सदस्यांचा सत्कार सुतारवाडी येथील गीता बाग येथे खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादीचे नेते मधुकरशेठ पाटील, विनोद पाशिलकर, मोतीराम तेलंगे, सुरेश महाबळे, दया पवार, विजय पवार, शिवराम शिंदे, किसन मोरे, नंदकुमार म्हात्रे, लक्ष्मण महाले, श्री जयवंत मुंडे तसेच तालुका कमिटी, तालुका प्रमुख, सर्व कार्यकर्ते, विभागीय अध्यक्ष, विविध भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवातीला मधुकर पाटील यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की खा.सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांचे भक्कम नेतृत्व आपल्याला लाभल्यामुळे आपल्याला बारा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यात यश आला. आपल्याला जनतेने निवडून दिले आता येणाऱ्या निधीचा पुरेपूर वापर सर्वांगिक गावाच्या विकासासाठी करणे आपले कर्तव्य असून आपल्याला जो विजय प्राप्त झाला तो एकत्रितपणे निवडणुकीत समोर गेलो याचा. आता नवीन निवडून आलेल्या सदस्यांसाठी प्रशिक्षणाची गरज असून तो लवकरच सुनील तटकरे साहेबांनी आयोजित करावा अशी इच्छा व्यक्त केली. आंबेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश महाबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
खा.सुनिल तटकरे यांनी सांगितले की पुढाऱ्याकडे निष्ठा असणे आवश्यक आहे. विचारासाठी एकनिष्ठ आवश्यक आहे. शिवराम शिंदे यांनी पराकोटीचे कष्ट घेऊन ग्रामपंचायत राखली. वरवटणेची ग्रामपंचायत भाई टक्के यांनी सांभाळली. सरपंच पद महत्त्वाचे असून 9, 11, 17, 15, 7 सदस्यां मधून कोणतरी एकच सरपंच व उपसरपंच होईल. पक्षाचा निर्णय अंतिम असेल, पुढचा काल महत्त्वाचा आहे. नव्याने आलेल्या सदस्यांचा लवकरच शिबिर घेतला जाईल. जास्तीत जास्त निधी कसा देता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. काही गावात अस्वच्छतेचे प्रमाण जास्त आहे. कचरा पाहावयास मिळतो ही वाईट गोष्ट आहे. आदर्श गाव ग्रामपंचायत कशी असावी हे माझ्या धाटाव ग्रामपंचायतीने दाखविले. गावाच्या विकासाच्या कल्पना कशा राबवायच्या याकडे लक्ष देऊ. पवार साहेब, अजित पवार हे खरे निष्ठावंत नेते आहेत.
ज्या गावात शरद पवार साहेबांचा जन्म झाला अशा काटेवाडीत सुनेत्रा वहिनीने काम केला तो गाव कसा आदर्श केला हे पाहणे जरुरीचे आहे. कारण पवार साहेब हे पवार साहेबच आहेत आणि दादा हे दादाच आहेत. उद्याची दिशा कशी असली पाहिजे यासाठी सर्वांना निमंत्रित केले आहे. अभिनंदन, कौतुक करावा यासाठी आपण सर्व एकत्र जमलो. या जिल्ह्यात आपल्या विचारांची पायमुळे घट्ट रोवली आहेत. अनिकेत तटकरे यांनी निवडणुकीत पंधरा दिवस कार्यकर्त्यांसमवेत गावा गावांना भेटी दिल्या. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला यश येऊन 21 पैकी 12 ग्रामपंचायती राष्ट्रवादी कडे आल्या ही आनंदाची बाब आहे. रायगडच्या राजकारणाची सलामी या निवडणुकीत दिसून आल्याचे प्रसंगी सांगितले.