सुशांत राजपूला मिळणार चित्रपट सृष्टीतील ‘हा’ सर्वोच्च पुरस्कार

मुंबई : दिवंगत बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला 2021 मध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. सुशांतला या पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली गेली आहे. मरणोत्तर मिळणारा हा पुरस्कार त्याचे कुटुंबिय स्वीकरतील.

दादासाहेब फाळके अवॉर्डने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवर याबाबतीची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डने 2021 मध्ये सुशांत सिंह राजपूतला सन्मानित केले जाईल. सुशांतला भारत सरकारकडून सुद्धा सन्मानित केले जाईल अशी चर्चा आहे.