सेवानिवृत्त कर्मचारी सातव्या वेतन आयोगा पासून वंचीत

shyam16

कोलाड (श्याम लोखंडे ) सरकारी कर्मचारी वर्गाला सातवा आयोग लागू झाल्यानंतर वाढीव मिळणारी रक्कम पाच टप्प्याने देण्याचे शासनाने जाहीर केले होते याचा पहिला टप्पा 2020 मध्ये मिळणार होता मात्र कोरोना संकटामुळे संपूर्ण जगासह देशाची  अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. त्यामुळे अनेकांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली  नसल्याने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सेवेत असलेल्या शासकीय शिक्षकांच्या रकमेचा पहिला टप्पा गेल्या महिन्यात त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. मात्र सेवानिवृतांना पहिल्या हप्त्या पासून वंचित राहावे लागले आहे. वास्तविक सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पहिला हप्ता बँकेत जमा होणे अत्यंत गरजेचे आहे. जे सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत  त्यांच्यापैकी काहीजण मृत्यू पावले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला जी पेन्शन मिळते त्या तुटपुंजा पेन्शनवर कुटुंब कसे चालत असेल याचा विचार शासनाने करणे आत्यावश्यक आहे. गेल्या वर्षी पहिला हप्ता जमा झाला नाही कारण तशी बिकट परिस्थिती होती.

मात्र आता सर्वच गोष्टी पूर्वपदावर आल्या आहेत. त्यामुळे सेवेत असलेल्या शिक्षकांचा पहिला हप्ता जमा झाला. परंतु सेवानिवृत्त शिक्षकांचा पहिला हप्ता अद्यापही त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने अनेक सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. खात्यात पैसे न जमा झाल्याने आम्ही हायात असताना आमचे पैसे आम्हाला मिळत नसतील तर नंतर त्याचा काय उपयोग एवढ्या वर्ष शासकीय सेवा करून आपल्या पैशांसाठी वाट पहावी लागत असेल तर हे कितपत योग्य आहे. आपली रक्कम आज आपल्या खात्यात जमा होईल उद्या जमा होईल या आशेवर आणखी किती महिने प्रतीक्षा करायची. अशा प्रकारची प्रतिक्रिया अनेकांडन व्यक्त केली जात आहे.

तरी फेब्रुवारी अखेर व मार्च महिन्यापूर्वी तरी पहिला हप्ता आमच्या खात्यात जमा होईल का ? असा प्रश्न अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पडला असून सदरची रक्कम खात्यात शासनाने लवकरात लवकर जमा करण्यात यावी अशी मागणी करत आहेत.