उरण (विठ्ठल ममताबादे) : जेएनपीटी (जे एन पी.ए ) प्रशासनाने दि. २९/१२/२०२२ रोजी एक परिपत्रक काढून नोकर भरती करणार असल्याचे सांगीतले. मात्र या परिपत्रकाला ज्यांनी १९९७ ला साडेबारा टक्के लढ्याची सुरवात दिबा पाटील साहेब यांच्या सोबत केली होती असे उरण मधील सामाजिक कार्यकर्ते जगजीवन भोईर यांनी जोरदार विरोध केला असून जे.एन.पी.ए ने नोकर भरती बाबत काढलेले परिपत्रक हे निवळ धूळफेक असून बेरोजगार युवकांची दिशाभूल करणारा आहे. स्थानिक बेरोजगारांवर अन्याय करणारा आहे असे सांगत स्थानिकांना भूमीपुत्रांना नोकरभरतीत सामाऊन घेण्यासाठी व आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवार दि २/१/२०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता JNPT टाउनशिप मधील स्टाफ क्लब येथे बेरोजगार युवकांना एकत्र जमण्याची हाक जगजीवन भोईर यांनी दिली आहे.
आपली भूमिका स्पष्ट करताना जगजीवन भोईर यांनी सांगितले की माझा जेएनपीए ने दिनांक २९/१२/२०२२ रोजी काढलेल्या परिपत्रकाला विरोध आहे कारण जेएनपीए ने मान्य केलेले तत्व A, B, C कॅटेगीरीच्या तत्वाला हरताळ फासण्यासारखे आहे.
सध्या A कॅटेगीरी मधील जेएनपीटीचा दाखला असलेल्या अंदाजे ४५० प्रकल्पग्रस्तांनी जेएनपीए कडे अर्ज केला आहे.
यात महत्वाची समस्या म्हणजे वयोमर्यादा.या प्रकल्पग्रस्त दाखला धारकांपैकी ३० वर्षे ओलांडलेले ५० टक्के प्रकल्पग्रस्त आहेत. मग या अंदाजे २२५ प्रकल्पग्रस्तांना JM BAXI व SEZ मध्ये नोकऱ्या देतील का ?
कारण BMCT मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्या गेल्या नाहीत.
या प्रकल्पग्रस्त दाखला धारकांपैकी अंदाजे ५० स्त्रिया आहेत यांना JM BAXI व SEZ मध्ये नोकऱ्या देतील का ?
कारण BMCT मध्ये स्त्रियांना अंदोलन करूनही नोकऱ्या दिल्या गेल्या नाहीत.
या प्रकल्पग्रस्त दाखला धारकांपैकी अंदाजे ५० प्रकल्पग्रस्त (पदवीधर) ग्रज्युएट नाहीत.
अशा दहावी व बारावी झालेल्या व पदवीधर नसलेल्या प्रकल्पग्रस्तांना JM BAXI व SEZ मध्ये नोकऱ्या देतील का ?
या सर्वांची गोळाबेरीज करता फक्त १२५ प्रकल्पग्रस्त दाखलेधारक उरतात. यात पण JM BAXI व SEZ मध्ये अनुभव असलेले तरूण मागितले, Candidates उमेदवार मागितले तर किती प्रकल्पग्रस्त शिल्लक राहतील याचा तुम्हीच अभ्यास करा. त्यातल्या त्यात यांच्या IQ TEST म्हणजे नोकरी मोजक्याच प्रकल्पग्रस्तांनी मिळणार.म्हणून सर्व प्रकल्पग्रस्तांनो जागे व्हा.आपले आंदोलन हे जेएनपीए चा दाखला असलेल्या प्रत्येकाला नोकरी मिळवण्याठी असले पाहिजे.JNPA नोकरी देत नसेल तर बेकार भत्ता मिळालाच पाहिजे.तसेच B व C कॅटेगीरी याबद्दल बोलायचे झाले तर उर्वरीत जेएनपीटीची नोटीस असलेले प्रकल्पग्रस्त कुटंबातील बेरोजगारांना (A कॅटेगीरी) नंतर अग्रक्रम देणे आवश्यक आहे.
कारण कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिल्यानंतर दुसऱ्या भावंडाला नोकरी मिळाली नाही आणि जेएनपीटी कामगारांची मुले आता शिकून बेरोजगार झाली आहेत मग आशांना नोकऱ्या देण्यासाठी B कॅटेगीरी तयार करण्यात आली.प्रकल्पग्रस्त दाखला धारकांपैकी मोजकी लोक इंजिनिअर आहेत. नोटीस (अवार्ड कॅापी) असलेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबातील तसेच जेएनपीटीच्या कामगारांची मुले इंजिनिअर व उच्च शिक्षित आहेत त्यांना B C कॅटेगरी मधून नोकऱ्या मिळतील.हीच ती वेळ नोकरी मिळवण्याची. म्हणून आंदोलनाची दिशा देण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी सोमवार दिनांक ०२/०१/२०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता जेएनपीटी टाउनशिप येथील स्टाफ क्लब येथे बेरोजगार युवकांनी, स्थानिक भूमीपुत्रांनी मोठ्या प्रमाणात जमावे.एकत्र यावे असे आवाहन जगजीवन भोईर यांनी केले आहे.