पनवेल (संजय कदम ) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंख यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त आयोजीत मोफत भोजन व्यवस्थेसाठी सहकार्याचे आवाहन केले आहे.
दरवर्षी महेश साळुंखे पक्षाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम जसे मोफत वह्या वाटप मोफत गणवेश वाटप, रुग्णांना फळे वाटप, वृक्ष लागवड विविध सामाजीक उपक्रम राबवित असतात.यावर्षी पक्षाच्या रायगड जिल्हा शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाला अभिवादन करबासाठी पनवेलवरून जाणाऱ्या भिमभक्तांना मोफत भोजन वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता पनवेल मधिल भिमभक्तांनी सहकार्य करव्याचे आवाहन महेश साळुंखे यांनी केलेले आहे.