हक्काच्या रेल्वे साठी पेणकरांचं 11 डिसेंबरला रेल रोको आंदोलन

pen-railway

पेण (राजेश प्रधान) : कोकण रेल्वेसाठी पेण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन राष्ट्रहीता करीता रेल्वेला दिली त्यातील अनेक भुमीपुत्र आजही रेल्वेच्या नोकरी पासून वंचित आहेत. तरी सुद्धा तालुक्यातील नागरिकांची रेल्वे प्रवासाची उत्तम सोय होईल अशी खात्री होती.
परंतु रेल्वे प्रशासना कडून कायमच पेणकरांवर अन्याय करण्यात येत आहे. पेण तालुक्यातील नागरिकांना हक्काची रेल्वे मिळावी यासाठी त्रस्त रेल्वे प्रवाशांनी “माझं पेण” संघटनेच्या नेतृत्वाखाली 11 डिसेंबर ला रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
“माझं पेण” सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर संघटना असून या संघटनेमार्फत पेण तालुका परिसरातील जनसामान्यांच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले जाते.

पेण- दिवा मेमु पळवली 

पेण- दिवा – पेण हि सकाळी ७:३० वाजताची मेमू रेल्वे रोह्याला पळविल्याने पेणकरांच्या नशिबी पुन्हा उभ्याने प्रवास करण्याची वेळ आली आहे.

या आहेत मागण्या : –

  •  पेण- दिवा- पेण मेमू  रेल्वे पूर्वीप्रमाणे सुरू करून तिच्या फेऱ्या वाढवाव्यात,
  • कमीत कमी दहा एक्सप्रेस गाड्या पेणला थांबाव्यात रोहेकरांना त्यांच्या मागणीप्रमाणे दिवा रोहा दिवा रेल्वे उपलब्ध करून द्यावी,
  • दिवा सावंतवाडी दिवा या रेल्वेला पेण येथे थांबा मिळावा,
  • महाग केलेले रेल्वे तिकीट पूर्ववत करावे,
 या व इतर काही मागण्यांकरिता “माझं पेण” व प्रवासी सन्मान समिती यांनी वरिष्ठ रेल्वे कार्यालयांना व पेण रेल्वे स्टेशन मास्टर यांना पत्र दिले आहे. या मागण्या .10 डिसेंबर 22 पर्यंत पूर्ण न झाल्यास 11 डिसेंबर 2022 रोजी “माझं पेण” संघटना व रेल्वे प्रवासी सन्मान समिती रेल रोकोचे जन आंदोलन करेल असा इशारा माझं पेण संघटनेकडून देण्यात आला आहे. आंदोलनाची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष  रितेश शहा यांनी दिली.

पेणकरांनी उभ्यानेच प्रवास करायचा का ?

सकाळी 6.00 वाजता रोहा – दिवा
सकाळी 7.30 वाजता रोहा – दिवा
दुपारी  11.40 वाजता रत्नागिरी – दिवा
या सर्व रेल्वेतून पेणच्या प्रवाशांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो.
केवळ सकाळी 6.45 वाजता पेण – दिवा हि एकच रेल्वे पेण च्या प्रवाशांना बसुन जायला मिळते ती सुद्धा रेल्वे प्रशासन कधी पळवून नेईल याचा भरवसा नाही अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी हबीब खोत यांनी दिली.

 

nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *