हमरापूर उपकेंद्रांतर्फे ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

santosh6

पेण ( संतोष पाटील ) : पेण तालुक्यांतील हमरापूर गावात उपकेंद्रांतर्फे गावातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

शासनाने 30  वर्षे वया पुढील स्ञी व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.  त्यानुसार सदरची तपासणी केली जात आहे. यामध्ये रक्तदाब व मधुमेह व इतर तपासणी करण्यात येत असून आता पर्यंत जवळपास 200 जणांची तपासणी करण्यात आली आहे.

समुदाय आरोग्य अधिकारी संतोष पांडुळे, आरोग्य सेवक कोमल पाटील व रमेश म्हात्रे, आशासेविका मीना पाटील यांचे पथक ही आरोग्य तपासणी करत आहेत.