हातचलाखीने ATM कार्ड बदलून केली फसवणूक

atm

पनवेल (संजय कदम) : हातचलाखीने एटीएम कार्ड काढून ताब्यात घेऊन त्या माध्यमातून ४१ हजार रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी तळोजा पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इरफान अहमद अबीर अहमद चौधरी हे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. या वेळी एटीएममध्ये दोन अनोळखी इसम आले व मदत करत असल्याचे भासवून इरफान यांचे एटीएम कार्ड मशीन टाकले व त्यांच्याकडून कार्डचा पिन नंबर घेतला. पैसे न 1 निघाल्याने इरफान एटीएममधून बाहेर पडले.

काही वेळाने त्यांच्या मोबाइलवर ४१ हजार १६० रुपये काढल्याचा मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याची समजताच याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *