राज्यात एका दिवसात सर्वाधिक सुमारे 17000 नवे रूग्ण

मुंबई : महाराष्ट्रात शनिवारी कोराना व्हायरस संसर्गाची सर्वाधिक 16,867 नवी प्रकरणे समोर आली आणि यासोबतच संक्रमितांची एकुण संख्या वाढून 7,64,281 झाली आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या अधिकार्‍याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यात मृतांची संख्या वाढून 24,103 पर्यंत पोहचली आहे. राज्यात एका दिवसात 328 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात सध्या 1,85,131 लोक व्हायरसने संक्रमित आहेत. दरम्यान, 11,541 लोक बरे झाल्याने त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रूग्णांची संख्या 5,54,711 झाली आहे. मुंबईत दिवसभरात संसर्गाची 1,432 नवी प्रकरणे समोर आली आणि 31 रूग्णांचा मृत्यू झाला. शहरात संक्रमित लोकांची एकुण संख्या 1,43,389 पर्यंत पोहचली आहे तर मृतांचा आकडा वाढून 7,596 झाला आहे.

पुणे शहरात शनिवार 1,972 नवी प्रकरणे समोर आली आणि 32 रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 40,12,059 जणांची टेस्ट करण्यात आली आहे.