#हॅलो अलिबाग! अभिनेता अनिल कपूरची समुद्र किनार्‍यावर भटकंती

पेण ( सुदर्शन शेळके ) : हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा अलिबाग समुद्र किनार्‍याला भेट दिली…आणि या आठवणी त्यांनी छायाचित्रांच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेयर केल्या.

या 63 वर्षीय अभिनेत्याने सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये अलिबाग बीचला 20 वर्षापूर्वी दिलेल्या भेटीबद्दल जास्त काही लिहिले नसले तरी अलिबागवरील त्यांचे प्रेम मात्र स्पष्टपणे जाणवते.

अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर छायाचित्रे पोस्ट करताना लिहिले आहे की, ‘त्या भेटीला 20 वर्षे झाली…#हॅलो अलिबाग’.

अनिल कपूर यांनी जे फोटो पोस्ट केले आहेत त्यामध्ये त्यांनी व्हाईट शर्ट आणि ब्ल्यू डेनिम परिधान केली आहे…आणि पाठीमागे दिसत आहेत…नारळाची झाडे आणि समुद्र.

अलिबाग समुद्र किनार्‍याला दिलेल्या भेटीमुळे झालेला आनंद त्यांच्या चेहर्‍यावर अगदी ओसंडून वाहताना दिसत आहे. फोटोंमध्ये अनिल कपूर मनापासून हसताना दिसत आहेत.

सोशल मीडियावरील या फोटोंवर फॅन्सने आपल्या प्रेमळ कमेंट केल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे…सर, तुम्ही 63 वर्षांचे आणि दिसता माझ्यापेक्षा तरूण…आणि सुंदरसुद्धा!