माथेरान : अश्वपाल संघटनेचे सक्रिय सदस्य स्व. हेमंत बिरामणे यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.
मुख्य रस्त्यावर असणाऱ्या हेमंत भाई बिरामणे चौकात हेमंत यांच्या नामफलकास त्यांचे मेहुणे सुनील शिंदे आणि बहीण वर्षा शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी त्यांचे बंधू रवींद्र बिरामणे,भाचे हर्ष शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश सुतार, सनी महामुनकर,प्रदीप रांजणे,अमोल चौगुले आदी उपस्थित होते.सर्वांशी नेहमीच हसतमुखाने वागणारे स्मितहास्य असणारे, सर्वांमध्ये मिळूनमिसळून राहणारे संघटनेला नेहमीच आधार देणारे असे हे एक चांगले व्यक्तीमत्व अचानक कोरोना काळात आपल्यातून निघून गेले, ही जाणीव ओळखून मुख्य रस्त्यावर हेमंत बिरामणे यांची आठवण मित्र परिवार तसेच सर्वाना कायमस्वरूपी राहावी यासाठी अश्वपालक तथा धनगर समाजाचे तत्कालीन अध्यक्ष राकेश कोकळे यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात सातत्याने पाठपुरावा केला होता त्यामुळेच हेमंत बिरामणे यांच्या नावाचा नामफलक लावण्यात आलेला आहे.