१० वर्षाखालील चिमुकल्यांनी धरमतर खाडी ते गेट वे ऑफ इंडिया हे सागरी अंतर पोहून केले पार

sea-alibag

ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यासह महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी कामगिरी भिवंडीतील चिमुकल्या जलतरणपटूंनी केली. जलतरण स्विमिंग या क्षेत्रातील रिले ह्या क्रीडा प्रकारात सरवली गावातील कु.दक्ष आनंद भोईर आणि गोवे गावातील कु.हर्ष विकास पाटील, कु.धीरज निलेश पाटील आणि कुमारी सेजल विकास पाटील या १० वर्षाखालील चिमुकल्यांनी अलिबाग जवळील धरमतर खाडी ते गेट वे ऑफ इंडिया_ हे सागरी ४२ किलोमीटरचे अंतर १० तास २० मिनिटांमध्ये पोहून पार केले.

आज झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत याचारही जलतरणपटूचा संन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) अजिंक्य पवार, सर्व सन्मानीय विषय समिती सभापती, सन्मानीय सदस्य यांनी या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंनी पहाटेची बोचरी थंडी आणि वेगाचे वारे अशी प्रतिकूल हवामान असतानाही हे अंतर उत्कृष्ठरित्या पार केले. त्यांचे प्रशिक्षक देविदास पाटील, मार्गदर्शक रविंद्र तरे यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली