१५ जानेवारीला जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन, स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा-२०२३ दादरला होणार साजरा

joy-gudhekar
मुंबई (शांताराम गुडेकर) : महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात काम करणारी जोगेश्वरी -मुंबई येथील जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन, स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा -२०२३ असा भव्य -दिव्य कार्यक्रम दि. १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता आरजू सभागृह , तिसरा मजला , रत्नमणी बिल्डिंग ,दादर (पुर्व ),मुंबई याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा.बाबूभाई भवानजी (माजी महापौर , मुंबई ),ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राम नेमाडे ,दै आपलं महानगर संपादक -संजय सावंत , कामगार नेते अविनाश दौंड ,दैनिक मुंबई मित्र संपादक अनघा राणे, शिक्षक नेते जनार्दन जंगले, आरजू स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मेहता यांची उपस्थिती लाभणार आहे.
सदर कार्यक्रमात संस्थेच्या कार्याचा संपूर्ण आढावा घेतानाच विविध क्षेत्रातील गुणवंत समाजरत्नांचा,मान्यवरांचा विशेष पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे .तरी या कार्यक्रमास सर्वानी आवर्जून उपस्थित राहण्याचे निमंत्रण संस्था अध्यक्ष गणेश हिरवे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी -९९२०५८१८७८ यांच्याशी संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *