पार्किंग केलेल्या ट्रेलर मधून स्टील चे रॉड चोरी करणारं त्रिकुट जेरबंद

steel-rod
पनवेल (संजय कदम) : स्टील चे रॉड चोरणाऱ्या त्रिकुटास गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल च्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना स्टील रॉड चोरणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती गुप्त बातमीद्वारा कडून मिळाली त्यानुसार त्यांच्या पथकाने करंजाडे जवळील निलेश ढाबा याठिकाणी पार्किंग केलेल्या ठिकाणी असलेल्या टेलर मधून स्टील रॉड चोरी करणाऱ्यावर छापा टाकून पकडले असता सचिन खोत(वय ३७), सुनील यादव(वय २३), रुदल मुरली (वाय ५४) या तीन आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.