कोलाड (श्याम लोखंडे) : कुणबी समाजामध्ये सामाजिक जाणिव आणि समाजात समाज प्रबोधन करण्यासाठी कुणबी जोडो अभियान ही संकल्पना संघाच्या वतीने अमलात आणली आहे. यासाठी समाजाला एकसंघ कऱण्यासाठी व त्यांच्या मूलभूत न्यायहक्कांसाठी तसेच जोडण्यासाठी कुणबी जोडो अभियान समिती महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत तर रत्नागिरी नंतर 8 जानेवारी रोजी ही अभियान रॅली रायगड जिल्ह्यात दाखल झाली आहे असून जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात कुणबी बाधवांशी सुसंवाद साधत समाज प्रबोधन जनजागृती करणार आहेत.
पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा, तळा तद्नंतर शुक्रवारी 13 जानेवारी रोजी रोहा तालुक्यात दाखल होत असून या कुणबी जोडो अभियानाची सुरुवात कोलाड आंबेवाडी नाका येथून सकाळी ठीक 10 वाजता भव्य दिव्य स्वरूपात आयोजन केले असून याकरिता रोहा तालुक्यातील कुणबी युवक बांधव तसेच कार्यकर्ते यांनी या कुणबी जोडो अभियानात अधिक अधिक सहभागी होण्याचे आवाहन रोहा तालुका कुणबी युवक संघटनेचे अध्यक्ष अनंत थिटे यांनी केले आहे.
जेष्ठ समाज नेते तथा रोहा तालुका अध्यक्ष शिवराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 8 जानेवारी रोजी रोहा तालुका कुणबी युवक मंडळाचे विभागातील प्रमुख पदाधिकारी यांची सभा कुणबी समाजनेते माजी आमदार पा रा सानप कुणबी भवन रोहा येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित समाज बांधव युवकांना मार्गदर्शन करतांना कुणबी जोडो अभियानास जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. यावेळी रायगड जिल्हा कुणबी युवक मंडळाचे अध्यक्ष महेश बामुगडे,सतीश भगत,तालुका सचिव मंगेश देवकर,गजानन बामणे,महेश भगत,डॉ श्यामभाऊ लोखंडे, महेश तुपकर, शशिकांत कडू, विकास खांडेकर, अरुण कोंडे,रवींद्र आयरे,संतोष खेरटकर,हेमंत मालुसरे, चेतन मालुसरे,केशव म्हस्के यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी बहुसंख्येने समाज युवक बांधव उपस्थित होते .