नागोठणे (महेंद्र माने) : ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन आयोजित 16 व्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत रायगड जिल्हा संघाने 7 सुवर्ण, 14 रजत, 19 कांस्य पदके मिळवीत नावीन्यपूर्ण कामगिरी करीत दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमात 18 ते 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस समारंभ त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे महासचिव किशोर येवले, नगरसेविका प्रतिभाताई पवार व समाजसेवक मंगलकुमार कोटकर या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी किशोर येवले यांनी या खेळाचा महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून शालेय खेळामध्ये समावेश केला असून त्यासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त खेळाडूंनी शालेय स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन करून खेळाडूंच्या आहाराविषयी व खेळाच्या तांत्रिक बाबींबद्दल माहिती दिली.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यातील 335 खेळाडूंनी सहभाग घेतला होते. त्यामध्ये नागनाथ बोळगे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या संघाने 36 सुवर्ण, 22 रजत, 28 कांस्य पदके मिळवून प्रथम क्रमांकाचा चषक पटकवला. तर धनंजय जगताप यांचे मार्गदर्शन लाभलेल्या रायगड जिल्हाच्या संघाने 7 सुवर्ण, 14 रजत, 19 कांस्य पदके मिळवून दुसऱ्या क्रमांकाचा चषक पटकावला. तसेच पूर्वी गांजवे,आदित्य केंजळे व विजय फरगडे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या पुणे जिल्हाच्या संघाने 3 सुवर्ण, 6 रजत, 22 कांस्य पदके मिळवून तिसरा क्रमांकाचा पटकावला.
या स्पर्ध्येमध्ये रायगड जिल्हा संघामध्ये 1)सुवर्ण पदक विजेते – स्वरूप सावंत, समृध्दी भोनकर, श्रेया सिंग, श्रेयश शेडगे, समर ठाकूर व सम्यक गायकवाड, 2)रजत पदक विजेते- श्रीयश शेडगे, अंश रातवडकर, वेद जाईलकर, हर्षिता कामथे, समृध्दी भोनकर, दिपांशू माळी, समृध्दी राऊत, नेहा दोरे, अनिश पालकर, अनुप राऊत, उमेद जाधव व अनय जगताप तर 3)कांस्य पदक विजेते- शौर्य धसाडे, हनी मोदी, अंश रातवडकर, अनय जगताप, अनुप राऊत, पीयूष साळुंखे, रुचल जाना, नेहा दोरे, स्मित ठाकूर, अर्थव देवरे, तेजस साळुंखे, समृध्दी राऊत, सम्यक गायकवाड, समर ठाकूर, रोहित गायकवाड, श्रेयश शेडगे, हर्षिता कामथे, गौरी मोदी व वेद जाईलकर हे स्पर्धक विजेते ठरले आहेत. त्यांच्या विजयाचे जिल्ह्यातून कौतुक व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अंशुल कांबळे, पौर्णिमा तेली, वैभव काळे, ओमकार अभंग, नागेश बनसोडे, आकाश धबाडगे, भरत जाधव, सचिन गर्जे, रामचंद्र बदक, सोमनाथ सोनावणे, श्वेतम बुग्गवर, तृप्ती बनसोडे, रुपाली वाघ या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती बनसोडे यांनी केले.