भाकरवड (जीवन पाटील) : अलिबाग तालुक्यातील चरी येथे 89 वा वर्धापनदिन सोहळा 27 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला.
या संपाला 76 वर्षे पूर्ण झाली म्हणून2009 साली लोकनेते स्व दत्ता पाटील यांच्या नेतृत्वाने व मान्यवरांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव साजरा केला त्यावेळी चरी शेतकऱ्यांना संपाची आठवण म्हणून चरी ग्रामपंचायत समोर स्मारक उभारण्यात आला आहे. चरी गावाला भेटी देणाऱ्या माननीय व्यक्ती स्तंभाला अभिवादन करीत असतात चरी, कोपर, कोपर पाडा दरवर्षी 27 नोव्हेंबर हा दिवस ग्रामपंचायत चरी ,ग्रामस्थ, पंचक्रोशीतील शेतकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिवस साजरा करतात आज 89 वर्ष पूर्ण केले आहे .
यावेळी सायकल स्पर्धा आयोजित करून याचे उद्घाटन करण्यात आले चित्रलेखा पाटील यांनी चरी ग्रामपंचायत हद्दीतील 70 मुलींना मोफत सायकली वाटप करून त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी सायकल स्पर्धेचे आयोजन सरपंच नीलम पाटील यांनी करून त्यांना पारितोषिक, रोख रक्कम स्व ताराबाई तुकाराम पाटील यांच्या नावाने त्यांची सून यांनी देण्यात आली.
या वेळी माजी आमदार पंडित शेठ पाटील , झेप फाउंडेशन च्या अध्यक्षा, रा जी प सध्यक्षा चित्रा ताई पाटील , सरपंच नीलम पाटील , उपसरपंच अभय पाटील , उपसरपंच कुरकोंडी जयश्री माणिक , जेष्ठ नागरिक नारायण पाटील , दत्तात्रेय पाटील ,माजी सभापती प्रमोद ठाकूर , माजी सरपंच विजय ठाकूर , माजी सभापती प्रकाश पाटील, जेष्ठ साहित्यीक सुधाकर पाटील उरण, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र ठाकूर, रोहित जाधव, तेजश्री ठाकूर, शुभांगी पाटील ,भारती पाटील , अध्यक्ष कोपर पाडा उमाकांत पाटील,अध्यक्ष चरी प्रमोद भगत , अध्यक्ष कोपर जगदीश थळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी आपल्या मनोगतात प्रामुख्याने ज्या अद्भुत पूर्व संपामुळे कसेल त्याची जमिन हा नैसर्गिक न्यायतत्व अंमलात आणणारा कुळ कायदा तयार झाला त्या चरी संपाला स्व नारायण नागु पाटील, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उर्फ आप्पासाहेब यांच्या प्रभावशाली नेतृत्वाला आणि संपातील लढवय्या शेतकऱ्यांच्या संघर्षाला कृताध्यपूर्वक अभिवादन करण्यासाठी आज89व्या वर्षात प्रदार्पण करीत असलेल्या संपाचा वर्धापन सोहळा साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत आपण कसत असलेल्या जमिनीची मालकी त्या वेळी खोत सावकारांकडे होती आणि आपली पूर्वज केवळ वेट बिगार म्हणून राबत होती त्या शोषण विरुद्ध आपल्या समाजातील एक लढवय्या नेता स्व नारायण नागु पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांना संघटीत करून आपल्या हक्का साठी जागृत केले आणि 1932 ते 1939 अशी सात वर्षे शेतकऱ्यांनी सावकारांच्या जमिनी ओसाड टाकल्या स्व आप्पासाहेब यांच्या बरोबर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, भाई चित्रे ,चंद्रकांत अधिकारी, श्यामराव परुळेकर ,सुलभा नाना टिपणीस , खांद्याला खांदा लावून नेतृत्व करीत होते. त्यांचे लोन उरण तालुक्यातील भेंडखळ ,जसखार येथे पोचले त्या संपामुळे कुळ कायदा अस्तित्वात आला आणि स्वतंत्र नंतर कसेल त्याची जमीन हे तत्व प्रस्तापित झाले आणि आपण जमिनीचे मालक झालो आहोत असे प्रतिपादन माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी केले.
चरी संपाला 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून2009 साली लोकनेते स्व दत्ता पाटील यांच्या नेतृत्वाने व मान्यवरांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव साजरा केला त्यावेळी चरी शेतकऱ्यांना संपाची आठवण म्हणून चरी ग्रामपंचायत समोर स्मारक उभारण्यात आला आहे. चरी गावाला भेटी देणाऱ्या माननीय व्यक्ती स्तंभाला अभिवादन करीत असतात चरी, कोपर,कोपर पाडा , दरवर्षी 27 नोव्हेंबर हा दिवस ग्रामपंचायत चरी ,ग्रामस्थ, पंचक्रोशीतील शेतकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिवस वर्धापनदिन म्हणून साजरा करतात कार्यक्रम संपन्न करण्यासाठी गृप ग्रामपंचायत चरी, ग्रामस्थ चरी, कोपर , कोपर पाडा ,प्राथमिक शाळा चरी यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज थळे यांनी केले