अलिबाग : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड व मॅट्रिक्स कॅड अकॅडमी, खारघर यांच्या वतीने ऑनलाइन मार्गदर्शन (Webinar) सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींनी या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन कार्यालयाचे सहायक आयुक्त शा. गि. पवार यांनी केले आहे.
हे वेबिनार शुक्रवार, दि. 28 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11:00 ते 12:00 या वेळेत होणार असून या वेबिनार सत्राचा विषय Business opportunities in the 3D Printing Industry हा आहे.
वेबिनारचे प्रशिक्षक मेकॅनिकल इंजिनियर बलभीम कामन्ना हे असून ऑनलाइन मार्गदर्शन लिंक https://meet.google.com/mqg-vsoi-rif ही आहे.या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी लिंक वर क्लिक करावे, आपल्याकडे Google meet app यापूर्वी install केलेले नसेल तर install करून घ्यावे, आपण Google meet app मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे, या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे, दिलेल्या लिंक मधून connect झाल्यावर लगेच आपला video व mice mute/ बंद करावे, सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक unmute / सुरु करून विचारावे व लगेच माईक mute/ बंद करण्याची दक्षता घ्यावी, प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावेत, या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सहायक आयुक्त शा. गि. पवार यांनी केले आहे.