45 मिनिटांत घरी येणार किराणा सामान, Swiggy ची नवी सेवा सुरू

मुंबई : कोराना काळात लोकांना बाहेर पडावले लागू नये यासाठी ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विगीने आता अवघ्या 45 मिनिटांत किराणा सामानाची होम डिलिव्हरी देण्याची सेवा सुरू केली आहे. कंपनीने किराणा होम डिलीव्हरी सेवेचे नाव स्विगी इन्स्टामार्ट असे ठेवले आहे.

सकाळी 7 ते दुपारी 12
या सेगमेंटमध्ये स्विगी फ्लिपकार्ट क्विक, बिग बास्केट, डुन्झो, ग्रोफर्सशी स्पर्धा करणार आहे.ऑर्डर मिळाल्यानंतर 30-45 मिनिटांत वस्तूंची होम डिलिव्हरी होईल. सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत ही सुविधा उपलब्ध असेल. स्नॅक्स, आइस्क्रीम, इन्स्टंट जेवण, फळ-भाज्या, किराणा वस्तू ऑर्डर स्विगी इन्स्टामार्ट सेवेद्वारे देता येते.

कोरोना संकटामुळे स्विगीच्या अन्न वितरण व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. किराणा डिलिव्हरीवर आता कंपनी लक्ष केंद्रित करणार आहे. आता डार्क स्टोअर्सद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची कंपनीची योजना आहे. त्यात 2,500 हून अधिक वस्तू उपलब्ध असतील. व्हर्च्युअल स्टोअरच्या भागीदारीत स्विगीने ही सेवा सुरू केली आहे. सध्या गुरुग्राममध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ही सुविधा बंगळुरुमध्येही उपलब्ध सुरू होईल, असे स्विगीने सांगितले